तरूणाचा जीवघेणा स्टंट

 


काही लोकांचे छंद खूप विचित्र असतात, ते आपला छंद जोपासण्यासाठी जीव धोक्यात घालतात. शिवाय सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करत असल्याचं आपण पाहिलं आहे.

धोकादायक स्टंट करणं अनेकांना महागात पडल्याची अनेक उदाहारणं समोर आहेत. तरीही धक्कादायक स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकते.

सध्या असाच एक धक्कादायक स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण बिनधास्तपणे जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओतील तरुणाचा स्टंट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय थोडाजरी समतोल बिघडला असता, तर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता असं लोक म्हणत आहेत.

व्हिडिओमधील तरुण एका उंच इमारतीच्या छतावरून उडी मारून दुसऱ्या इमारतीच्या छतावर अत्यंत धोकादायक अशी उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीदेखील काही वेळ श्वास रोखून धराल यात शंका नाही. शिवाय हा स्टंट किती धोकादायक आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसून येत आहे. हा स्टंट करताना त्या तरुणाकडून थोडीशी चूकही जीवघेणी ठरली असती. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओंमध्ये जसा स्टंट केले जात आहे तसा कोणीही करु नका असं आवाहन नेटकरी करत आहेत.

Post a Comment

0 Comments