रात्री अचानक गायब झाली १३ वर्षीय मुलगी , आज दुपारी शिवारात आढळला मृतदेह

 


तालुक्यातील पिंपळदरी शेत शिवारातील जंगलात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कोमल मारुती मार्कड असे मृत मुलीचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, कोमल मारुती मार्कड ही वसमत तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी आहे. सध्या मामाच्या गावी पिंपळदरी येथे कोमल राहते. येथील जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गात ती शिक्षण घेत होती. दरम्यान, शुक्रवारी गावातील यात्रेचा समारोप होता. रात्री आठ वाजेपासून कोमल घरात आढळून आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, कोमल आढळून आली नाही.

दरम्यान, आज दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळदरी शेत शिवारात शेळ्या चारणाऱ्या महिलेस कोमलचा मृतदेह आढळून आला. महिलेने लागलीच शेजारील शेतकऱ्यांना याची माहिती दिली. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर कळमनुरी ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, उपनिरीक्षक कृष्णा सोनवणे, जमादार गजानन होळकर, जगन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला. मुलीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले शकले नाही.


Post a Comment

0 Comments