संतापजनक; भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, ज्युनिअर विद्यार्थ्याचं रॅगिंग, केली मारहाण

 


हैदराबादच्या महिंद्रा विद्यापीठात रॅगिंगचे आणखी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर रॅगिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तेलंगणाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भागीरथ त्याच्या मित्रांसह एका ज्युनिअर विद्यार्थ्याचं रॅगिंग करताना दिसत आहे.

मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साई भागीरथवर कारवाई करण्यात आली आहे.

तेलंगणाभाजपाचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्या मुलावर मंगळवारी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेत्याच्या मुलावर अलीकडेच एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या परिसरात मित्राच्या बहिणीशी गैरवर्तन केल्याबद्दल विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हा मुलगा इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण दुसऱ्याला मारताना आहे.

रॅगिंगच्या या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी साई भागीरथ आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुट्टी असल्याने वसतीगृह बंद असून, विद्यार्थी परतल्यानंतर चौकशीनंतर घटनेची वेळ कळेल. बंदी संजय यांचा मुलगा अनेक वादात अडकला आहे, ज्यामध्ये दिल्लीत शिकत असतानाच्या एका घटनेचा समावेश आहे, जिथे त्याला अशाच वर्तनासाठी कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी भागीरथ श्री राम नावाच्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसत आहे. या मारामारीत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. बंदी संजय यांचा मुलगा साई भागीरथ याच विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे. त्याने विद्यार्थ्याला मारहाण तर केलीच, पण अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये भागीरथ विद्यार्थ्याला धमकावताना आणि घटनेबद्दल कोणालाही सांगू नका किंवा त्याला ठार मारण्याचा इशारा देत असल्याचे देखील दिसत आहे

Post a Comment

0 Comments