शैतानी बाप! बायकोचा बदला घेण्यासाठी तिळगुळाएवजी मुलांना पाजले विष , त्यानंतर.....

 


मकर संक्रांतीच्या दिवशीच नागपुरात एका सैतानी बापाने पत्नीच्या वादाचा बदला घेण्यासाठी चक्क पोटच्या मुला-मुलीला विष दिले. यात सातवर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, बारावर्षीय मुलगा गंभीर आहे, तर दुसरीकडे बापानेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.

मनोज अशोक बेले (४५), असे सैतानी बापाचे नाव आहे. त्याचा पत्नी प्रियासोबत सातत्याने वाद व्हायचा, त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहायचे. सातवर्षीय तनिष्का व बारावर्षीय प्रिन्स हे आईसोबत राहायचे, तर मनोज एकटा राहायचा. पती-पत्नीने आपसात केलेल्या समझोत्यानुसार तनिष्का व प्रिन्स हे दर रविवारी वडिलांकडे जायचे. रविवारी सकाळी आजोबा राजू तल्हार यांनी दोघांना मनोजच्या घरी सोडले. मनोजने मुलांना खाऊपिऊ घातले व जेवणात विष टाकले. त्यांचा गळा आवळण्याचादेखील प्रयत्न केला. त्यानंतर मनोजने गळफास घेतला.

मेकॅनिक असलेल्या मनोजला दारूचे व्यसन होते. मुलांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी पत्नी मुलांसोबत वेगळी झाली होती. नोव्हेंबरमध्ये त्याने तनिष्काचा, तर २८ डिसेंबरला प्रिन्सचा वाढदिवस साजरा केला होता.


Post a Comment

0 Comments