पैशासाठी विवाहितेचा छळ

 


तुझ्यावर कोणीतरी करणी केली आहे. तुझ्या हातचे अन्न खाल्ले तर मी मरेल. तुझ्या माहेरच्या लोकांकडून आम्हाला मानपान मिळाला नाही. व्यवसाय करण्यास माहेरहून 2 लाख रूपये आणावे', या मागण्या करीत 31 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

वांबोरी येथे हा प्रकार घडला. शिल्पा अमोल गाडे (वय 31 वर्षे, रा. ढवळे वस्ती, वांबोरी, ता. राहुरी, हल्ली गडाख वस्ती, वांबोरी, ता. राहुरी) या तरूणीचा विवाह (दि. 30 जानेवारी 2016) रोजी वांबोरीतील अमोल अरुण गाडे याचे सोबत झाला. लग्नानंतर सासरच्या लोकांनी शिल्पा गाडे यांना एक वर्ष व्यवस्थित नांदविले.

नंतर शिल्पा यांचा पती अमोल वेळोवेळी म्हणायचा, 'तुला कोणीतरी करणी केली आहे,' असे म्हणत नेहमी मारहाण करीत असे. शिल्पा यांचे सासरचे लोक म्हणायचे, 'तुझ्या आई वडिलांनी आम्हाला लग्नात मान-पान, भांडे, मुलाला दागीने काही दिले नाही. तुझ्या आई- वडिलांकडुन व्यावसायास 2 लाख रुपये घेऊन ये, तरचं तुला नांदवू. नाही तर तू आत्महत्या कर. घरातून निघून जा,' असे म्हणत शिल्पास सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक छळ करुन घरातून बाहेर काढले. शिल्पा गाडे यांच्या फिर्यादीवरून पती अमोल अरुण गाडे, सासरे अरुण दामोधर गाडे, सासु आशाबाई गाडे (सर्व रा. वांबोरी) विरोधात मारहाण, शारिरीक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


Post a Comment

0 Comments