भाऊच निघाला वैरी....प्रॉपर्टीच्या वादातून सख्या भावाचा खून

 

नातेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहेत. लहाने भावाकडून मोठे भावाची हत्या करून अपघाताच बनाव केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

नाशिकच्या म्हसरूळ परिसरात भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून सख्या भावनेचा भावाचा खून केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. 10 जानेवारीला म्हसरूळ येथील एका कॅनेलमध्ये दुचाकीस्वाराचा मृतदेह आणि दुचाकी पडलेली असल्याचे आढळून आला होता.

याबाबत म्हसरूळ पोलिसांत अपघात असल्याचे प्राथमिक लक्षात येत असताना अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा अपघात  नसून घातपात असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला

मयत ज्ञानेश्वर कराड याचा भाऊ संशयित दीपक कराडने त्याच्या तीन साथीदारांसोबत ज्ञानेश्वर याच्या डोक्यात रोडने मारून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याची देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments