भीषण अपघात; बाप- लेक ठार तर माय - लेक जखमी

 


दुचाकी वरून घुग्गुस ला जात असलेली दुचाकी उभ्या ट्रक ला धडकली. या भीषण अपघात दुचाकीस्वार बाप व लेक ठार झालेत तर माय व लेक जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 20 जानेवारीला सायंकाळी 7: 30 वाजता घडली.

गणेश मडावी (35) व चार वर्षीय बालक मृत्युमुखी पडले तर गणेश ची पत्नी जखमी असून दीड वर्षीय मुलगी सुखरूप आहे. हा परिवार नायगाव येथील निवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील नायगाव शिवारात दुचाकीचा भीषण अपघात झाला. नायगाव वरून घुग्गुस ला आपल्या दुचाकी क्रमांक MH-29-A- 5421 ने जात असलेल्या परिवारावर काळाने घाला घातला. रस्त्यात उभा असलेला ट्रक क्रमांक MH- 34- AB- 4729 ला धडकलेत. शुक्रवारी सायंकाळी आपल्या परिवारासह घुग्गुस ला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सूचित केले. आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कारवाई सुरू आहे.


Post a Comment

0 Comments