महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले

 


मकर संक्रांतीनिमित्त पूजा करण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना बजाजनगर येथे रविवारी (ता.१५) घडली. महिलेने आरडा ओरड केल्याने काही तरुणांनी पाठलाग केला.

आरोपींनी पिस्तूलचा धाक दाखवून घटनास्थळावरून पोबारा केला.

पार्वती संजय पतंगे (वय ४५,रा.श्री विठ्ठलकृपा सोसायटी जागृत हनुमान मंदिराजवळ बजाजनगर असे गंठण हिसकावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (ता.१५) रोजी पार्वती पतंगे ही महिला मकरसंक्रांत असल्याने पूजेसाठी विद्या पाटील, शालिनी श्रीरामे, लता दवंगे या महिलांसह जात होत्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जागृत हनुमान मंदिराकडून (एम.एच-१६, जी.एफ-५३८२) या दुचाकीवर दोन अनोळखी आरोपी समोरून आले.

त्यांनी पार्वती पतंगे यांच्या गळ्यातील ६ तोळ्यांचे सोन्याचे गंठन हिसकावले. यावेळी झटापटीत साडेचार तोळ्यांचे सोने पतंगे यांनी घट्ट धरून ठेवले. परंतु यावेळी हार तुटल्याने दीड तोळे सोन्याचे दागिने घेऊन आरोपींनी पोबारा केला. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तर तोपर्यंत चोरटे फरार झाले होते.

पार्वती पतंगे या महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. त्यांनी आरडाओरड केल्याने दोघांनी चोरट्यांचा पाठलाग केला. वैष्णौ देवी मंदिराजवळ चोरट्यांना तरुणांनी पकडले.

दरम्यान, चोरट्यांनी तरुणांवर कट्टा रोखला.आणि बंद पडलेल्या कंपनीमध्ये पळ काढला. अशी आपबिती या तरुणांनी सांगितली. विशेष म्हणजे महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर फरार होत असलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांचा व्हिडिओ सुद्धा काढला.


Post a Comment

0 Comments