एकाच महिलेशी दोघांचे प्रेमसंबंध, एका मित्राने दुसऱ्याचा केला तलवारीने खून

 


ओझर परिसरात दोन मित्रांचे एकाच महिलेवर प्रेमसंबध असल्याने एकाने दुसर्‍या मित्राचा तलवारीने वार करत निर्घूण खून केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघडकीस झाली आहे.

पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. जयेश देवराम भंडारे (दोघेही रा. आंबेडकर नगर, ओझर), रावसाहेब उर्फ संदीप मधुकर बनसोडे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत प्रमोद दत्तू निकाळजे (वय ३२, रा. ओझर, ता. निफाड) असे मृत युवकाचे नाव आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी ओझर पोलीस ठाणे हद्दीत आंबेडकरनगर, ओझर परिसरात प्रमोद दत्तू निकाळजे, यास अज्ञात आरोपीतांनी धारदार हत्याराने गंभीर दुखापत करून ठार केले होते.

याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्ष अशोक रहाटे यांनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली. मयत प्रमोद निकाळजे यांचेबाबत सविस्तर माहिती घेवून मयत हा घटनेच्या दिवशी कोणा-कोणास भेटला. त्यास शेवटचे कोणासोबत पाहिले, याबाबत तपास सुरू केला. त्याप्रमाणे प्रमोद निकाळजे राहत असलेल्या परिसरातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना पोलीस पथकांनी सविस्तर विचारपूस केली. गुन्हे तपासात मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे घटनेच्या दिवशी प्रमोद निकाळजेचे दोन युवकासोबत वाद झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित जयेश देवराम भंडारे, रावसाहेब उर्फ संदीप मधुकर बनसोडे यांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत दोघांनी प्रमोद निकाळजेचा खून केल्याची कबुली दिली. १२ जानेवारी रोजी मध्यरात्रीचे सुमारास यातील प्रमोद निकाळजे याच्यावर तलवारीने, चॉपरने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

मयत प्रमोद निकाळजे व आरोपी जयेश भंडारे या दोघांचे ओझर येथील एकाच महिलेशी प्रेमसंबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद होवून आरोपी जयेश भंडारे व त्याचा मित्र संदिप बनसोडे या दोघांनी मिळून मयतावर तलवारीने व चॉपरने वार करून जीवे ठार मारले आहे. यातील दोन्ही आरोपींनावरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. उत्कृष्टरित्या तपास केल्याने पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपासी पथकास १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.


Post a Comment

0 Comments