वडीलांच्या कारखालीच सापडला चिमुकला...

 


मुंबईहून पुणे येत असताना जेवणासाठी थांबलेल्‍या कुटूंबावर मोठा आघात झाला. वडील पार्किंगमधून गाडी काढत असताना चिमुकला पळाला अन्‌ गाडीखाली सापडला. हे दृश्‍य पाहून सर्वांचा थरकाप उडाला असून आईने देखील आक्रोश केला.

मुंबईहून पुण्याचे दिशेने जात असताना लोणावळ्यातील  हॉटेलमध्ये किरण माने हे कुटुंबासह थांबले होते. याच दरम्‍यान वडिलांच्या गाडीखाली येऊन तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना लोणावळ्यातील हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडलीय. किआंश किरण माने अस मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

जेवण झाल्यानंतर पार्किंगमधून गाडी काढत होते. याचवेळी तीन वर्षीय किआंश हा गाडीकडे धावला. वडीलांना हे न समल्‍याने त्‍यांनी गाडी रिव्‍हर्स काढली. परंतु, चिमुकला गाडीखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत लोणावळा शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments