प्रेयसीच भुत मला सतावतं, ... घाबरलेल्या प्रियकराची पोलिसांसमोर कबुली अन् अखेर 8 महिन्यांनी त्या हत्येचा उलगडा

 


छत्तीसगडमधील कोरबा येथे पोलिसांनी एका हत्या प्रकरणात ६ महिन्यांनी जंगलातून एका मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन मोठा खुलासा केला आहे.

रिसडी परिसरात राहणारी अंजू यादव हिचा प्रियकर गोपाल खडिया याने खून करून मृतदेह जंगलात 20 फूट खड्डा खोदून पुरला होता. बुधवारी पोलीस-प्रशासनाच्या उपस्थितीत खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. गोपालने पोलिसांना सांगितलं की, हत्येनंतर त्याच्या प्रेयसीचं भूत त्याला सतावत होतं. त्यामुळे तो भीतीच्या छायेत जगत होता.मुलगी 8 महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत असून नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ही घटना झेलवाडी येथील सागवान रोपवाटिकेची आहे. येथे राहणारी 24 वर्षीय अंजू यादव 8 महिन्यांपासून बेपत्ता होती.

जुलै 2022 मध्ये मृत तरुणीची आई रामशीला यादव यांनीही रामपूर चौकी येथे आपल्या मुलीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. गोपाल खडिया (वय २५) नावाच्या तरुणावरही आईने संशय घेतला होता. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी एसपीकडे दाद मागितली आणि पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला.

मयत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गोपाल खडिया याला मंगळवारी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा मान्य केला. आरोपीने सांगितलं की, तो वीटभट्टीवर ट्रॅक्टर चालक असून अंजू यादवही तिथे विटा भरत असे. तिथे दोघांची भेट झाली आणि काही दिवसांच्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांचं प्रेमप्रकरण तीन वर्षे चाललं.

यानंतर प्रेयसीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. यामुळे व्यथित होऊन त्याने गर्लफ्रेंड अंजूला मार्गातून हटवण्याचा कट रचला. तो बहाण्याने प्रेयसीला झेलवाडी येथील सागवान रोपवाटिकेत घेऊन गेला.

जिथे तिचा गळा आवळून खून केला आणि 20 फूट खड्डा खणून मृतदेह नर्सरीमध्ये पुरला. याशिवाय त्याने पोलिसांना सांगितलं की, हत्येनंतर त्याच्या प्रेयसीचं भूत त्याला सतावत होतं. त्यामुळे तो भीतीच्या छायेत जगत होता. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने मृत तरुणीचा सांगाडा बाहेर काढला. रामपूर आणि माणिकपूर चौकीचे पोलीस घटनास्थळी हजर होते. आपल्या मुलीचा सांगाडा पाहून मृत तरुणीच्या आईला रडू कोसळलं. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.


Post a Comment

0 Comments