संतापजनक; सरकारी नोकरी वाचवण्यासाठी आई - बापानं 3 महिन्यांच्या चिमुरडीलाच संपवलं

 


बीकानेर - राजस्थानच्या बीकानेरमध्ये संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका जोडप्यानं पोटच्या मुलीला कालव्यात फेकले आहे. अवघ्या ३ महिन्याच्या चिमुरडीचा यात मृत्यू झाला आहे.

कंत्राटावर असलेल्या पित्याला कायमस्वरुपी नोकरी मिळण्यास अडचण होऊ नये यासाठी हे कृत्य आई बापाने केले. पोलिसांनी या घटनेत आरोपी आई बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस तपासात समोर आले की, या निर्दयी आई बापानं चौथ्या मुलीला जन्म दिला आणि तिला कालव्यात यासाठी फेकले कारण तिच्यामुळे आरोपी बापाच्या नोकरीवर संकट आले होते. दुचाकीवरून महिला आणि पुरुष आले होते. या दोघांच्यामध्ये चिमुरडी होती. कालव्याजवळ येताच त्यांनी पूलावरून मुलीला खाली फेकले. मुलीला फेकल्यानंतर दोघांनी मागे वळूनही पाहिले नाही आणि दुचाकीवरून वेगाने तिथून निघून गेले असं प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले.

घटनास्थळी काही युवकांनी तातडीने कालव्यात खाली उतरून मुलीला बाहेर काढले. या मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने वेळ निघून गेली होती. अवघ्या साडेतीन महिन्याच्या मुलीनं अखेरचा श्वास घेतला. मुलीला नाल्यात फेकून गायब झालेल्या जोडप्याला पोलिसांनी कोलायत हद्दीत दियातरा गावांत अटक केली. घटनास्थळापासून २० किमी अंतरावर पोलिसांनी दुचाकी जप्त केली.

बीकानेर पोलीस अधीक्षक योगेश यादव म्हणाले की, आरोपी पित्याचं नाव झंवरलाल असे आहे. ते एका शाळेत सहाय्यक पदावर कंत्राटावर काम करत होते. डिसेंबरमध्ये योगेश यादव याने त्यांना २ मुलं असल्याचं शपथपत्र भरले होते. साडेतीन महिन्याच्या अंशुचा जन्म १३ ऑक्टोबर २०२२ रोजी झाला होता. ती यादव जोडप्याचे चौथे अपत्य होते. त्याआधी योगेश यादव यांना ८, १० आणि ३ वर्षाची मुले होती. मात्र नोकरीवर असलेले संकट पाहून आरोपीने ८ वर्षाच्या मुलीला भावाला दत्तक दिली आणि साडेतीन महिन्याच्या मुलीचा काटा काढण्याचा प्लॅन रचला.योगेश यादव आणि त्याच्या पत्नीनं अंशुला कायमचं संपवण्यासाठी तिला कालव्यात फेकून दिले. त्यात निष्पाप जीवाचा बळी गेला.


Post a Comment

0 Comments