अट्टल दुचाकीचोराकडे सापडल्या 13 दुचाकी

 


अट्टल दुचाकीचोरास नाशिकरोडच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे पाच लाख रुपयांच्या १३ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते. पोलिसांचा गाडी चोरणाऱ्यांचा शोध सुरू असताना गेल्या महिन्यात सागर जाधव (रा. पाथर्डी रोड) यांची दुचाकी नाशिकरोड रेल्वेस्थानकाबाहेरून चोरी गेली होती. त्याबाबत त्यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. या चोरीचा तपास सुरू असताना परिमंडळ दोनमध्ये कार्यरत असलेले पोलिस नाईक विशाल पाटील यांना गाड्या चोरणारा संशयित योगेश दाभाडे (रा. अशोकनगर, सातपूर) हा नाशिकरोड रेल्वेस्थानकात परिसरात फिरत असताना नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे आदींनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments