अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. संशयितास अटक

 


चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी संशयित हजरत उर्फ इरफान मुल्ला (27) या युवकास अटक केली. पीडिता ही इयत्ता नववीची विद्यार्थीनी आहे. दोन दिवसांपूर्वी संशयित हा पिडितेच्या घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेऊन आतमध्ये शिरला.

तसेच दाराची कडी लावून संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घटनेची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. तसेच संशयिताने तिला एक अज्ञात गोळी खाण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितावर भादंसंच्या कलम 452, 342, 376(3), 506(1), 328 तसेच पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.

Post a Comment

0 Comments