गाडीची तोडफोड करत सोनसाखळी व मोबाईल हिसकावला

 याप्रकरणी मायकल डॉमनिक फर्नाडीस (वय 31 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश विश्वकर्मा (वय 27),शुभम जाधव (वय 28) निलेश पाटोळे (वय 27) सर्व राहणार पिंपरी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कारसमोर टूव्हीलर आणत रस्ता आडवून फिर्यादीला मारहाण केली, तसेच त्यांच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची 55 हजार रुपयांची सोन्याची साखळी, 30 हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण 85 हजार रुपायांचा ऐवज चोरून फिर्यादीच्या कारच्या मागील व पुढील काचा दगडाने फोडून नुकसान केले.यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments