मुंबई - नाशिक महामार्गावर एसटीने बाप लेकिसह 4 जणांना चिरडले

 


मुंबई-नाशिक महामार्गावर एसटी बसने  एका लहान मुलीसह चौघांना उडवले. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी जवळील कोशिंबे फाट्याजवळ एसटी महामंडळाच्या बसने भरधाव वेगात महामार्गावरुन रस्ता ओलांडताना दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली.

 या अपघातात सहा वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरेत चित्रित झाली आहे. 

एसटी महामंडळाची बस भरधाव वेगात महामार्गावरुन जात होती. यावेळी रस्ता ओलांडताना एसटीने दुचाकी स्वाराला जोरदार धडक देत उडवले. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जिज्ञासा जाधव, अभिजीत जाधव या दोघांना देखील धडक बसली. या अपघातात बाइक स्वार ज्ञानेश्वर पष्टे आणि त्याच्या मागे बसलेला मित्र जखमी झालेत.

रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बाप लेकीसह एकूण चौघ जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिज्ञासा जाधव या सहा वर्षाच्या मुलीच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने तिला ठाणे येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ठाणे येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.


Post a Comment

0 Comments