मेट्रोल रील करायला गेली, आणि ट्रोल झाली ; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले , म्हणाले " सार्वजनिक ठिकाणी,

 


सध्या सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मेट्रोमध्ये अनोखे व्हिडीओ बनवणे हा जणू एक ट्रेंडच बनला आहे. कारण अनेक तरुण तरुणी मेट्रोत जाऊन वेगवेगळे स्टंट करतात आणि ते व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट करताना दिसत आहेत.

ज्यामध्ये कधी एखादा तरुण चक्क टॉवेल गुंडाळून मेट्रोत प्रवेश करतो तर कधी कोणी तरुणी मेट्रोत लटकताना दिसते. त्यामुळे अनेकजण फेमस होण्यासाठी मेट्रोत काहीही स्टंट करणारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अशातच आता आणखी एका मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून नेटकरी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही वापरकर्त्यांना या मुलीचा अवतार आवडला असून व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.इंस्टाग्राम रील बनवणाऱ्यांसाठी मेट्रो हा जणू अड्डाच बनला आहे. त्यामुळे काहीजण मेट्रोत प्रवास करण्यासाठी नव्हे तर फक्त रील काढण्यासाठी येतात की काय? असा प्रश्न लोकांना पडला आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यामध्ये तरुण रीलसाठी मेट्रोमध्ये विचित्र स्टंट करताना दिसतात. अशातच आता एक मुलगी मेट्रोत ‘भूल भुलैया’ची ‘मंजुलिका’ बनून चढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या या मुलीचा व्हिडीओ the.realshit.gyan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडीओध्ये ‘मंजुलिका’च्या गेटअपमध्ये मेट्रोमधून प्रवास करणारी एक मुलगी दिसत आहे. जी मंजुलिका सारखी हावभाव करुन प्रवाशांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.Post a Comment

0 Comments