इंस्टाग्रामवर हिंदू नाव ठेऊन मुलींना जाळ्यात ओढायचा युवक , असा झाला भांडाफोड

 


राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकार करत असताना हिंदू मुलींच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे आमिष दाखवून, ओळख लपवून हिंदू मुलींची फसवणुकीचे अनेक प्रकार उजडेत आहे. यामुळे उत्तर प्रदेशात जसा लव्ह जिहादचा कायदा आहे तसा महाराष्ट्रात सुद्धा लागू करावा यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. आता पुणे शहरातील मुस्लिम युवकाने इंदूरमधील हिंदू मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला. एका रिक्षा चालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदूत्ववादी संघटनांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

इंदूरच्या भंवरकुआन भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भेटायला पुण्याहून सदन सादिक खान आला. बजरंग दलाचा आरोप आहे की, त्याने इंस्टाग्रामवर नाव बदलून हिंदू मुलींशी मैत्री करत होता. त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला पकडून भंवरकुवान पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भंवरकुवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदन सादिक खान, (रा. ताडीवाल रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


Post a Comment

0 Comments