कुत्रा चावतोय म्हणुन डिलिव्हरी बॉयने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी

 


राज्यातील हैदराबाद शहरात एक अनोखी घटना घडली आहे. त्या घटनेमध्ये कुत्र्याने इतक भयानक हल्ला केला, कीडिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी कुत्रा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे कुत्र्याचा हल्ला सहन होत नसल्यामुळे डिलिव्हरी बॉयने तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. त्यावेळी इमारतीच्या आवारातील लोकांनी डिलिव्हरी बॉय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना डिलीवरी बॉयचा मृत घोषित केलं आहे.

तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील बंजारा हिल्स पोलिस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली आहे. त्या स्विगी डिलीवरी बॉयचं नाव रिजवान असल्याचं समजतंय. रिजवान ज्यावेळी फूड द्यायला गेला होता, त्यावेळी घरी असलेल्या कुत्र्याने त्यांच्या अंगावर जोराची झेप घेतली. कुत्र्याचा हल्ला पाहून घाबरलेल्या रिजवानने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. त्यावेळी त्याला जोरात जखम झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचं वय 23 होतं.

पोलिसांनी दिलेली माहिती, रिझवानने ज्यावेळी उडी घेतली, त्यावेळी तो रस्त्यावर पडून होता. तिथल्या काही लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांची गंभीर अवस्था होती, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात कुत्र्याच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली.


Post a Comment

0 Comments