बंद घराचे कुलूप तोडून एक लाखाची घरफोडी

 


ईश्वर गोवर्धन खत्री (वय 34, रा. वैष्णोदेवी मंदिर रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 3) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खत्री हे त्यांचे घर बंद करून 24 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता बाहेर गेले. त्यानंतर त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून 28 हजारांचे सोन्याचे दागिने, 17 हजारांची दोन घड्याळ आणि 70 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. 31 डिसेंबर रोजी सकाळी फिर्यादी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments