तीन जिवलग मित्रांचा शेवट दुदैवी , कोणालाच न सांगता पोहायला गेले अन्....

 


चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूरमध्ये असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात मोठा तलाव आहे. या तलावात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे 

तलावात बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले आहेत. ही कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात झाली आहे. काल (दि.26) रोजी ही घटना घडली आहे. रात्री उशीरा मुले का आली नाही याचा शोध घेतला असता ते तलावात बुडाल्याचे निदर्शनास आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. आज (दि.27) मागच्या काही तासांपूर्वी शोधमोहीम सुरू असताना या तिन मुलांचे मृतदेह तलावाच्या काठी आढळले. कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात ही मुले राहतात.

तिन्ही मुलांचे वय दहा वर्षाचे असून एकाच वर्गात शिकत होती. काल सुट्टी असल्याने सिमेंट कंपनीच्या कॉलनीत राहणारी ही मुलं खेळायला बाहेर पडली. मात्र रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. दरम्यान शोधाशोध सुरू असताना रात्री कंपनीच्या परिसरात असलेल्या तलावाजवळ मुलांचे कपडे आणि तीन जोड कपडे आढळले होते.

पारस गोवारदीपे, अर्जुन सिंह आणि दर्शन बसेशंकर अशी मृतकांची नावं आहेत. तलावात असलेल्या गाळामध्ये पाय फसल्याने मुलं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.


Post a Comment

0 Comments