इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू

 


भिवंडी येथील खाडीपार भागात दुमजली इमारतीचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला आहे. माजीद अन्सारी (२५) असे मृताचे नाव असून भिवंडी अग्निशमन दलाकडून इमारतीच्या ढिगाऱ्यात शोधकार्य सुरू आहे.

खाडीपार येथील श्याम उपाहारगृहाजवळ एक दुमजली इमारत आहे. शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास या इमारतीच्या सज्जाचा आणि छताचा काही भाग कोसळला. त्यामुळे इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात असलेल्या माजीद अन्सारी यांच्या अंगावर ढिगारा कोसळल्याने त्यांच्या मृत्यू झाला. तर, या ढिगाऱ्यातून अशरफ नागोरी (२२) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.


Post a Comment

0 Comments