चार किलो गांज्यासह दोघे ताब्यात

 


नगरमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना चार किलो गांजासह भिंगार पोलिसांनी गजाआड केले आहे. नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी परीसरात गुरुवारी (दि.26) ही कारवाई करण्यात आली.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींना 30 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. वसीम मुजाहीद शेख (रा. बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन चौक भिंगार), अजय उर्फ सोनू रामचंद मुदलीयार (रा. सिटीझन कॉलनी, विजय लाईन चौक, भिंगार) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी 25 हजार रूपये किमतीचा चार किलो 955 ग्रॅम गांजा, 65 हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल व पाच लाख रूपये किमतीची स्विफ्ट कार (एच 12 जेसी 8471) असा पाच लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार अजय नगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीचे ठाणेदार संपत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक किरण साळंके, गोविंद गोल्हार, विलास गारूडकर, राहुल द्वारके, आदींनी कारवाई केली.


Post a Comment

0 Comments