15 वर्षाच्या मुलावर ब्लेडने वार

 


जुन्या भांडणाच्या कारणावरुन शाळकरी मुलांनी एका १५ वर्षाचा मुलगा व त्याचा मित्र अशा दोघांवर ब्लेडने वार करुन त्यांना जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी चंदननगरमधील बोराटे वस्तीत राहणार्‍या एका पालकाने चंदननगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मदर टेरेसा शाळेत शिकणारा मुलगा व त्यांचे मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरीमधील गलांडेनगरमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलाबरोबर तीन महिन्यांपूर्वी एका मुलाशी भांडण झाले होते. फिर्यादीचा मुलगा मित्राबरोबर मदर तेरेसा शाळेतून चालत घरी येत होते.
बसस्टॉपजवळ आले असताना त्यांच्या शाळेत शिकणारा मुलगा व त्याचे ३ मित्र आले.
त्यांनी फिर्यादीचा मुलगा व त्याचा मित्रावर ब्लेडने हातावर, पोटारीवर वार करुन जखमी केले.
त्यातील एकाने फिर्यादीच्या मुलास कमरेच्या पट्टयांनी मारहाण केली. सहायक फौजदार ढावरे तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments