हॉटेलमध्ये मोठ - मोठ्याने गप्पा मारल्या म्हणुन हॉटेल चालकाकडून ग्राहकांना मारहाण

 


याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी मनोहर रघूनाथ मांगडे (वय 44 रा. मांगेवाडी) व ऋषिकेश जयसिंह देशमुख (वय 30 रा.मांगेवाडी) याना अटक केली असून निशांत जाधव (वय 25 रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत मल्हार रेस्टॉरंट येथे जेवण्यासाठी गेले होते. तेथे मित्रांसोबत मस्करी करत असताना हॉटेलचा वेटर तेथे आला व त्याने आरडा-ओरड करु नका असे सांगितले. मात्र पुन्हा गप्पा सुरु केल्या त्यानंतर हॉटेलचा मालक तेथे ला व त्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांशी वाद गालण्यास सुरुवात केली. यातून फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या बरगडीवर वार करण्यात आला, तसेच फिर्यादीचे मित्र यांच्याही कंबरेवर चाकुने वार करण्यात आला, लाकडी दांडक्याने डोक्यावर व डोळ्यावर मारून गंभीर जखमी केले. यावरून भोरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments