धक्कादायक; भावाला वाचवण्यासाठी आपल्याच 10 वर्षीय मुलीची केली हत्या

 


उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधून वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

अनम नावाच्या 10 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. 3 डिसेंबर रोजी ही मुलगी शेतात गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिच्या पोटावर खोल जखमा होत्या आणि आतडेही बाहेर आले होते. सुमारे अर्धा तास त्रास सहन केल्यानंतर कुटुंबासमोरच मुलीचा मृत्यू झाला.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईक शकीलवर हत्येचा आरोप केला होता, मात्र आता पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनमचे वडील अनीसने आपला भाऊ शादाबला बलात्काराच्या आरोपापासून वाचवण्यासाठी आपल्याच मुलीची निर्घृण हत्या केली. वडील अनीस, काका शादाब आणि आजोबा शेहजादे यांनी शत्रुत्वाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.


Post a Comment

0 Comments