पत्नीला शॉक देऊन खून

 


श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी आणखी एक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. धर्मांतर करून प्रेमविवाह केलेल्या एका महिलेचा तिच्या पतीने शॉक देऊन खून केला.

त्यानंतर तिचा मृतदेह राहत्या घरातच पुरल्याचे उघडकीस आले असून यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमा शर्मा ऊर्फ आक्शा फातिमाने सात वर्षांपूर्वी हाफीजपूर (जि. लखीमपूर खेरी) येथील मोहम्मद वसी याच्याशी धर्मांतर करून विवाह केला होता.

दोघेही एकाच भागातील रहिवासी असून त्यांना दोन मुलेही आहेत. त्यांच्या शेजारी राहणार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती मोहम्मद आक्शाला सातत्याने मारहाण करीत असे. आक्शाची सासू आशिया आणि दीर रफी हेही त्यांच्यासोबतच सरकारी कॉलनीमधील घरात राहात होते. बुधवारी तिची सासू आपल्या मुलीकडे कानपूरला गेली होती. त्यादिवशीच मोहम्मद वसी आणि आक्शामध्ये भांडण झाले. रात्री आक्शा झोपलेली असताना मोहम्मदने तिचे हातपाय बांधून तिला वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने शॉक दिला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments