भीषण अपघात: पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत वडीलांच्या मृत्यु

 


मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

यात कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, कार एका कठड्याला जाऊन धडकली. या कारमध्ये एकूण चालकासह चौघेजण होते. यामध्ये दोन मुलांसह पत्नी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु चालक पती जागीच ठार झाला.

दरम्यान अपघात झाल्यानंतर मदतीला धावलेल्या लोकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. यामध्ये चालकाचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेला आहे. तर गाडीचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे अती वेगात असलेल्या कारचा अपघात अत्यंत भीषण असल्याचे बोलले जात आहे.


Post a Comment

0 Comments