ट्रकचा अपघात , ट्रक चालकाचा मृत्यु

 


अपघात आज शुक्रवार 23 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा च्या सुमारास पुणे- मुंबई महामार्गावर घडला.

ट्रक क्र KA 56 2777 वरील चालक सूर्यकांत कांबळे रा. उमरगा मूळ कर्नाटक हा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये सिमेंट घेऊन पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना अपघाताच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या पुढे जात असणार्या ट्रकला (MH 13 DQ 9526) पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेमुळे ट्रक रोडवर पलटी होऊन हा अपघात झाला आहे.

अपघातात ट्रकमधील चालकास गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक मधील सिमेंट च्या गोण्या मार्गावर अस्तव्यस्त पडल्याने मुंबई कडे जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

अपघातातील दोन्ही ट्रक अफकॉन कडील क्रेन च्या मदतीने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली आहे. अपघाताच्या ठिकाणी म.पो.केंद्र बोरघाट, खोपोली पोलीस ठाण्याकडील स्टाफ, IRB कडील स्टाफ देवदूत टीम हजर होते. त्यांनी वाहतूक सुरळीत केली.  अपघातग्रस्त ट्रक ची केबिन पूर्णपणे तुटली असल्याने व मयत चालक हा रस्त्यावर खाली पडल्याने चालकाने सीट बेल्ट लावला नसल्याचे निदर्शनास आले.

Post a Comment

0 Comments