खून करून मृतदेह टाकला कचऱ्याच्या ढीगाऱ्यात

 


गोव्यातील गुन्हेगारी विश्वात दिवसेंदिवस अनेक घटना घडत आहेत. दिवसाढवळ्या चोरी, मारामारी आणि खुनाचे प्रकार वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, वेर्णा येथील इंडस्ट्रीयल परिसरात मेटास्ट्रीप्सजवळ एका पुरुषाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे.

याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. 

साकवाळ पंचायत क्षेत्रातील मेटास्ट्रीप कंपनी समोर कॉक्रीटच्या भंगार अंड्डयात खून झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सदर खून झरी सांकवाळ येथील राहणारा संजयकुमार यादव यांचा झाला असून, वेर्णा पोलिसांनी त्वरीत तपास कार्य करीत एका संशयीत आरोपी ट्रक चालक कन्हैयालाल यादव याला खून प्रकरणी अटक केली आहे.

साकवाळ झरी येथे राहणारा मुळ उत्तर प्रदेश येथील संजयकुमार यादव (35) याचा सोमवार (दि.26) मध्यरात्री आरोपी ट्रक चालक मुळ उत्तर प्रदेश येथील कन्हैयालाल यादव (32) यांनी खून केला. नंतर मंगळवार (दि.27) पहाटे 4 वाजता संजयकुमार यादव याचा मृतदेह साकवाळ मेटास्ट्रीप कंपनी समोर असलेल्या कॉक्रीटचा भंगार टाकणाऱ्या जागेत आणून टाकला. सदर मृतदेह कोणाच्या नजरेस पडता कामा नये म्हणून प्रेताच्या वर कॉक्रीटचा भंगार टाकला होता. मंगळवार (दि.27) सकाळी 9.30 वाजता येथे भंगार टाकण्यासाठी आलेल्यांना,या ठिकाणी प्रेत असल्याचा संशय येताच त्यानी वेर्णा पोलिसांना संपर्क केला.

वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रासिएस आपल्या इतर पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खून प्रकरणी त्वरीत शोध कार्य सुरु केले असता, संशयीत आरोपी यांच भागातील ट्रक चालक कन्हैयालाल यादव ट्रक घेऊन सार्वर्डे येथे गेल्याची माहीती पोलिसांना मिळाली.वेर्णा पोलिसांनी हुशारीने संशयीत आरोपी कन्हैयालाल यादव याला नंतर ताब्यात घेऊन चौकशी केली असता, संजयकुमार यादव याचा खून केल्याची कबूली दिली.आरोपी कन्हैयालाल याला पोलिसांनी घटनास्थळी आणून उलट तपासणी केली. यावेळ खून झालेला संजयकुमार यांची पत्नी देखिल घटनास्थळी दाखल झाली होती. कन्हैयालाल यांने संजयकुमार यांचा खून दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह साकवाळ पठारावर टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कदाचित संजयकुमार यांचा खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वेर्णा पोलिसांनी संजयकुमार यादव यांच्या खूनाचा पंचनामा करून मृतदेह मडगांव हॉस्पिसियो इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवली आहे. ट्रक चालक कन्हैयालाल यादव याला संजयकुमार यादव यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधिक्षक शेख सलीम यांच्या नेतृत्वाखाली वेर्णा पोलिस निरीक्षक डायगो ग्रासिएस पुढील तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments