थरार! आजीसाठी चोरट्यांशी रस्त्यावर भिडली तरुणी ; पोलीसांनी चोरांच्या पायावर झाडल्या गोळ्या

 विद्यार्थिनीच्या आजीच्या कानातील झुमके लुटून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांशी एक तरुणी भिडली. विद्यार्थिनी रिया हिने चोरट्यांना दुचाकीवरून खेचून रस्त्यावर पाडले.

घटनेनंतर ६ तासांत दोन्ही हल्लेखोर पोलिसांच्या चकमकीत पकडले गेले.

लालकुर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैदा परिसरातील ही घटना घडली. शनिवारी संतोष देवी (८०) या नात रिया हिच्यासोबत बाजारात जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वारांनी आजीच्या कानातील झुमके ओढले. आजी व नात चोरट्यांशी भांडत राहिली, मात्र मदतीसाठी कोणीही घराबाहेर पडले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पोलिसांनी पायावर झाडल्या गोळ्या
व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत दोन्ही हल्लेखोरांना पकडले. रात्री उशिरा पोलिसांची हल्लेखोरांसोबत आमने-सामने झटापट झाली. पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळू लागले. त्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सचिन आणि शिवम सोनी या हल्लेखोरांच्या पायाला गोळी लागली. त्यांची चौकशी केली जात आहे.


Post a Comment

0 Comments