युवकावर शस्त्राने वार

 


पुण्यातील कोथरुड भागात किरकोळ वादातून युवकावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यश कालीदास जगताप (वय १८, रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

प्रकरणी सचिन शंकर कदम (वय २३), प्रवीण शंकर कदम (वय २९, दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments