गुंडगिरी करणाऱ्या तिघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

 


हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील गोपाळपट्टी मध्ये भांडण करून हवेत कोयते फिरवून दहशत निर्माण केल्याने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 9 रोजी महाराजा बियर शॉपी च्या समोरील रस्त्यावर, मेन गोपाळपटटी चौक, मांजरी ब्राुद्रुक पुणे या ठिकाणी अनोळखी गुंडानी गैरकायदयाची मंडळी जमवुन किरकोळ कारणावरून स्थानिक लोंकाना शिवीगाळ करुन दगडाने, बेल्टने मारहाण करुन जखमी केले. एवढ्यावरच नं थांबता त्यांनी गाडीला लावलेले कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गु.र.नं 1554/2022, भा.द.वि.कलम - 307, 324, 504, 506, 143,145, 147,149 सह क्रिमीनल लॉ अमेंटमेंट कलम 3 व 7 प्रमाणे, भारतीय हत्यार कायदा कलम- 4(25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात यापूर्वी 7 आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर यापूर्वीचे कोणतेही गुन्हे दाखल नव्हते मात्र गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील मुख्य सराईत आरोपी पळून गेले होते.

मुख्य आरोपी समीर पठाण, शोएब पठाण, गणेश उर्फ दादा हवालदार हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते. नमुद आरोपी हे वेळोवेळी आपले राहण्याचे ठिकाण बदलत होते. ते गुन्हा दाखल झाल्यापासून भोर, सांगली, कोल्हापूर, बारामती असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याबाबत तांत्रिक माहीती प्राप्त होत होती.आरोपी गणेश उर्फ दादा हवालदार हा कामठघर, भिवंडी जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळताच तपास पथाकाचे पोलीस अंमलदार समीर पांडुळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ यांची तपास टिम जावून त्यांनी आरोपी गणेश ऊर्फ दादा हवालदार याला आज दिनांक 23 डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळेस ताब्यात घेतले.

तसेच पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर यांच्या तपास टिमने दातरंगे मळा, नालेगाव जिल्हा अहमदनगर याठिकाणी कारवाई करून आरोपी तपास टिमला पाहून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून आरोपी समिर पठाण व शोएब पठाण यांना दिनांक 23 रोजी सकाळी ताब्यात घेतले.

हडपसर पोलीसांनी केलेल्या तपासात एकाच दिवशी भिवंडी ठाणे व नालेगाव, अहमदनगर या भागात कारवाई करून समिर लियाकत पठाण वय 26 वर्ष रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे, शोएब लियाकत पठाण वय 22 वर्ष रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार वय 22 वर्ष रा. महादेवनगर हडपसर पुणे, यांना अटक केली. वरील 3 अटक आरोपी यांच्यावर हडपसर परिसरात मागील 7 वर्षापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे..
हडपसर पोलीसांनी या गुन्ह्रामध्ये आज पर्यंत एकुण 10 आरोपींना अटक केली आहे.

तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Post a Comment

0 Comments