तलवारीच्या वादातून एकाच्या हाता- पायावर केले वार

 


वालीवच्या नाईकपाडा परिसरात मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास वैयक्तिक वादातून ४५ वर्षीय एकावर तलवारीने हातापायावर वार करण्यात आले आहे.

त्याच्या कारवर फायरिंग करण्यात आली आहे. जखमींवर प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने वसईत खळबळ माजली आहे. वालीव पोलिसांसह इतर पोलीस ठाण्यातील व गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास नाईकपाडा येथे राहणारे हरजित सिंग उर्फ दादू (४५) यांच्या कारवर फायरिंग करून ३ ते ४ आरोपींनी तलवारीने हाता-पायावर वार केले. हा जीवघेणा हल्ला हा डुक्करावरून झालेल्या वादातून झाला. तर आरोपी आणि जखमी हे नातेवाईक आहेत. तर आरोपींनी हल्ला करून जखमी हरजित यांना घटना स्थळावरून उचलून गाडीतून रेंज नाका येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये सोडून गेल्याचेही सूत्रांकडून कळते. वसईतील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शिकलकर गँगवार सुरू तर झाला नाही ना अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.


Post a Comment

0 Comments