आळंदीत वाहतूक पोलीस निरीक्षक पवार यांचा सत्कार


  

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील तीर्थक्षेत्र आळंदीत कार्तिकी यात्रा आणि लग्न समारंभ काळात आळंदीतील वाहतुकीची समस्यां सोडविल्या बद्दल तसेच यात्रा काळात प्रभावी पोलीस बंदोबस्त व सुरळीत सुरक्षित ठेवत आळंदीतील वाहतूक कोंडी दूर केल्या बद्दल आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार साहेब यांचा पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

  या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र युवा महासंघ प्रदेश अध्यक्ष प्रवीण बोबडे, उपाध्यक्ष शशिकांत राजे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सहसरचिटणीस बाबासाहेब भंडारी, पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश शेळके, आळंदी संघटक दिपक बाबर, सदस्य नागेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी अँटी कोरोना टास्क फोर्सचे आळंदी समनव्यक अर्जुन मेदनकर यांचे हस्ते वाहतूक पोलिसांचे सुरक्षिततेसाठी ट्रीपल लेअरचे मास्क सुपूर्द करण्यात आले. 

  वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी आळंदी कार्तिकी यात्रा काळात शहरातून प्रभावी सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीचे नियोजन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात प्रभावी कामकाज केले. यामुळे आळंदीत प्रशस्त रस्ते, अतिक्रमण मुक्त फूटपाथ ठेवण्यात त्यांचे कार्यपद्धतीने यश मिळाले. याचे श्रेय आळंदी दिघी वाहतूक शाखेस जाते. पवार यांचे कार्याचे आळंदीत भाविक,नागरिक यांच्यात कोतुक होत आहे. या निमित्त पवार यांचा आळंदीतील विविध सेवाभावी संस्थानचे वतीने सत्कार करण्यात आला. या कार्तिकी यंत्रे भाविक,वारकरी यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. असून सेवा करण्याची संधी मिळाल्याने आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी कार्तिकी यात्रेत वाहतुकी सुरळीत, सुरक्षित वारी होण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था आणि नियोजन उत्तम केल्याने यात्रा सुरक्षित पार पडली. यासाठी स्थानिक,नागरिक,भाविक,अधिकारी, सेवाभावे संस्था, पदाधिकारी यांचेशी सुसंवाद राखत काम केल्याने आळंदीत त्यांचे कार्याचे कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments