चारित्र्यावर संशय , भर चौकात पत्नीच्या डोक्यात घातले फावडे

 


औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून खून, गुंडगिरी आणि चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने औरंगाबादकरांना चांगलाच धसका बसला आहे.

दरम्यान यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पैठणमधील नेहरू चौकात भर रस्त्यात महिलेच्या डोक्यात फावडे मारून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी 7 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


Post a Comment

0 Comments