या चिमुकल्याने चक्क कोंबडीची मान धरली, अन् पुढे काय झाले एकदा पाहाच

 


लहान मुलांचे अनेक गोंडस व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामधील त्यांचे हावभाव, मोठ्यांची केलेली नक्कल, त्यांची प्रत्येक नवी गोष्ट पाहिल्या नंतरची अचंबित झालेली प्रतिक्रिया सर्वकाही आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे असते.

असाच एका गोंडस मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील त्याच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

लहान मुलं अतिशय निरागस असतात, त्यांना एखादा प्राणी आपल्याला इजा करून शकतो याचीही समज नसते. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी समान असतात. अशीच निरागसता व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला खेळत असल्याचे दिसत आहे. तिथे असणाऱ्या कोंबडीलाही तो या खेळात सहभागी करून घेतो. तो चक्क कोंबडीची मान पकडून तिला गाडीवर बसवतो, ही गाडी त्याच्या सायकलला जोडलेली आहे. मग सायकल चालवत तो कोंबडीला गाडीची सफर घडवतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

Post a Comment

0 Comments