प्रेयसीला जंगलात नेऊन बॉयफ्रेंडने गोळी मारली

 


छत्तीसगढमध्ये श्रद्धा वालकर सारखीच धक्कादायक घटना घडली आहे. खासगी बँकेत काम करणाऱ्या तरुणीचा तिच्याच बॉयफ्रेंडने जंगलात नेऊन खून केला आहे. जंगलात तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर तिचा मृतदोह लपविण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याचा प्रकार घडला आहे.

प्रियकराने बँक कर्मचारी प्रेयसीला छत्तीसगढमधून ओडिशाला नेऊन हा गुन्हा केला आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यात राहणारी २१ वर्षांची तनु कर्रे ही रायपूरमध्ये एका खासगी बँकेत काम करत होती. ती २१ नोव्हेंबरला तिचा प्रियकर सचिन अग्रवालसोबत ओडिशाच्या बालंगीरला निघाली होती. तनुने प्रवासात तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू तिचे फोनवर बोलणे होऊ शकले नाही. ओडिशाला पोहोचल्यापासून सचिन तिच्याशी बोलण्यास देत नव्हता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांना ती जिवंतच असल्याचे भासविण्यासाठी सचिन त्यांच्याशी चॅटवर बोलत होता. परंतू, फोन केला तर उचलत नव्हता. यामुळे संशय आल्याने त्यांनी तनु हरविल्याची तक्रार रायपूर पोलिसांत केली. तेवढ्यात रायपूर पोलिसांना बालंगीरमध्ये एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. ती तनुच होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पहिला संशयित सचिनला ताब्यात घेतले. तो सतत त्याचे लोकेशन बदलत होता. पोलिसांनी अखेर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तनुचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध होते, यामुळे तिला फिरायला घेऊन जाण्याचे सांगून बालंगीरला आणले. तसेच जंगलात गेल्यावर तिच्यावर गोळ्या झाडून पेट्रोलने मृतदेह जाळला, असे त्याने पोलिसांना सांगितले.


Post a Comment

0 Comments