तक्रार केली म्हणून मुलीच्या दिराकडून महिलेला मारहाण

 


याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात विशाल कृष्ण थोरात (वय 26, रा.वेताळनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या बहिणीच्या  मुलाला जेवणासाठी घेऊन जाण्यासाठी दुचाकीवरून आल्या होत्या. त्या त्याला घेऊन जात असताना आरोपी दुचाकीवरून आला व त्याने तू माझ्या नावाची तक्रार करते का? असे म्हणत फिर्यादी यांच्या डोक्यात कशाच्यातरी सहाय्याने मारून जखमी करून पळून गेला. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments