पालम तालुक्यातील नाव्हलगाव येथे शनिवारी दुपारी पतीने पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी रविवारी (दि. ६) पतीसह इतर दोन आरोपींविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

याबाबतच्या अधिक माहितीनुसार शेषेराव माणिकराव जाधव (वय 45 वर्षे रा. तादुळवाडी ता. पालम) असे फिर्यादीचे नाव आहे. शेषेराव जाधव यांची मुलगी योगिता हिचे सासर पालम तालुक्यातील नाव्हलगाव आहे. नाव्हलगाव येथील राहत्या घरी तिचा सासरा दिलीप नारायण शिंदे, सासू सुनिता दिलीप शिदे व पती भागवत दिलीप शिंदे हे तिघे तिचा शारिरीक व मानसीक छळ करत होते. मुलगी झाली म्हणून तिला वारंवार त्रास देत होते. तिच्या पतिने म्हणजेच भागवत शिंदे याने शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तिला मारहाण केली यात तिचा मृत्यू झाला. 

मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यूस सासरा दिलीप शिदे, सासू सुनिता शिदे व पती भागवत शिदे हे जबाबदार असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पोलीस निरिक्षक प्रदिप काकडे यांच्या आदेशानुसार रविवारी (दि. ६) पालम पोलीस स्टेशन येथे खुनाच्या गुन्हासह विविध कलमानुसार दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि मारुती कारवार हे करीत आहेत.
Post a Comment

0 Comments