पायी जाणाऱ्या तरुणाला अडवून मारहाण करत लुटले

 


तुळशीराम भार्गव जाधव (वय 50 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चार अज्ञात इसमां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रसीक हा रात्रपाळीसाठी बसने जाण्यासाठी निघाला. त्यावेळी एका आरोपीने रसीकला अडवले त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी रसीक याने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले आरोपीने त्याला शिवीगाळ करत मारून टाकण्याची धमकी दिली.तसेच मोबाईल मागितला. यावेळी फिर्यादी यांनी माबोईल देखील नसल्याचे सांगितले.आरोपीने त्याच्या साथीदारांना हाक मारून हाताने व काचेच्या बाटलीने तसेच सिमेंटच्या गट्टूने मारून रसीक याला गंभीर जखमी केले. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments