हातचलाखीने केले 500 चे 20 रुपये, पण कमेऱ्यामुळे फसला रेल्वे कर्मचाऱ्याचा डाव

 


काहीजण आपल्या हातचलाखीने अनेकजणांना फसवत असतात. तर अनेकजण चोरीचे वेगवेगळे फंडे वापरत असतात. अशाच एका रेल्वे कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो आपल्या हातचलाखीने प्रवाशाने दिलेले ५०० रूपये चोरलेले या व्हिडिओत दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक प्रवाशी रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी गेल्याचं दिसत आहे. तो तेथील कर्मचाऱ्याला ५०० रूपयांचे नोट देतो पण कर्मचाऱ्याने त्याच्या हातचलाखीने ते पैसे खाली टाकून हातात २० रूपयांची नोट घेतली आहे. तर त्यानंतर प्रवाशाला पैसे कमी पडतात असं सांगताना या व्हिडिओत दिसत आहे.

पण कॅमेऱ्यामुळे या कर्मचाऱ्याचे भिंग फुटले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा २२ नोव्हेंबर रोजीचा असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Post a Comment

0 Comments