बायकोसह सासरच्या लोकांचा त्रास , जावयाने घेतला गळफास

 


समीर निवृत्ती नाईक (वय 38) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय 65) यांनी खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरची पत्नी आणि त्याच्या सासरकडची लोक त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होते. समीरने पत्नीला दहा लाख रुपये दिले होते. मात्र, आणखी पैसे देण्यात यावेत या मागणीसाठी त्याचा मानसिक छळ सुरू होता. याच त्रासाला कंटाळून समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, समीरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments