लग्नाच्या 10 दिवसानंतर नवी नवरी प्रियकरासोबत गेली पळून

 


उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या 10 दिवसांनंतर नवी नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल.

असं सांगितलं जात आहे की, ती तिच्यासोबत 50 हजार रूपये कॅश, दागिने आणि मोबाइल फोन घेऊन फरार झाली. या घटनेनंतर परिसरात हीच चर्चा रंगली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन चौकशी सुरू केली आहे. तरूणीचं लग्न 25 ऑक्टोबरला झालं होतं.

तरूण आणि तरूणी महाराजगंज जिल्ह्यातील परतावल भागात राहणारे आहेत. या लग्नामुळे नाराज तरूणीच्या प्रियकराने तिच्या सासरी जाऊन गोंधळही घातला होता. त्यानंतर तरूणीच्या सासरच्या लोकांनी तिच्या घरातील लोकांना या घटनेची माहिती दिली होती. सोबत असंही विचारलं की, जर तुमच्या मुलीचं प्रेम प्रकरण होतं तर मग तिचं लग्न का लावून दिलं. तसेच ते आपल्या मुलीला घरी परत घेऊन जा असंही म्हणाले.

यानंतर नवरीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराविरोधात पोलिसात तक्रार दिली. तसेच हा तरूण आपल्या विवाहित मुलीला त्रास देत असल्याचं आणि तिची छेड काढत असल्याचंही सांगितलं. पण शनिवारी सकाळी नवरी आपल्या माहेरून फरार झाली. सोबतच घरातील 50 हजार रूपयेही सुद्धा तिने सोबत नेले. हे पैसे घर बांधण्यासाठी ठेवले होते. सासरकडून मिळालेले लाखो रूपयांचे दागिने आणि फोनही ती घेऊन गेली.

पोलीस या केसची गंभीरतेने चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, तरूणी तिचा प्रियकर यांच्या लग्नाआधीपासून संबंध होते. त्याने तिच्या सासरी जाऊन मोठा गोंधळ घातला होता. आता दोघेही फरार आहेत. त्यांचा शोध घेणं सुरू आहे.


Post a Comment

0 Comments