पत्नीच्या मित्रावर प्राणघातक हल्ला , पतिवर गुन्हा दाखल

 


विशाल कामठे (वय 23) हा तरुण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आरोपी संतोष माणिक जाधव यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल महादेव मगर (वय 27) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की विशाल कामटे हा फिर्यादी राहुल मगर यांचा भाचा आहे. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तो वडकी नाला परिसरातील एका लॉज जवळ ओळखीच्या महिलेला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्या महिलेचा पती त्या ठिकाणी आला आणि त्याने माझ्या पत्नीला का बोलतो आणि तिला का भेटतो या कारणावरून विशाल कामठे याच्यासोबत वाद घातला.

त्यानंतर चिडून जाऊन त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने शरीरावर आणि डोक्यात जबर मारहाण केली. यामध्ये विशाल कामठे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक हंबीर अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments