पत्नीचा मृतदेह घेउन जाताना पोत फाटलं आणि हात पडला बाहेर , 26 दिवसाआधीच केल होत लग्न

 


सुखी संसाराची स्वप्नं बघत मुकेश केसवानी आणि जेनिफरनं प्रेमविवाह केला. त्यानंतर लगेचच त्यांच्यातील प्रेमळ नात्यात पराकोटीचा द्वेष निर्माण झाला.

सतत दोघांत भांडण होऊ लागली. लग्नानंतर 26 व्या दिवशीच मुकेशनं चाकूनं भोसकून जेनिफरचा खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावताना हा प्रकार उघड झाला आणि त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश व जेनिफर यांचं एकमेकांवर प्रेम होतं.

त्यांनी लव्ह मॅरेज केलं व अजमेरमध्ये एका कॉलनीत राहण्यासाठी आले. लग्नानंतर दोघांमध्ये सतत खटके उडत होते. ते दोघंही शेजाऱ्यांशीही काहीच बोलत नव्हते. पण त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं.

एकेदिवशी घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता; पण काही वेळानंतर तो आवाज बंद झाला. हा प्रकार दररोज घडत असल्याने शेजारच्या नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण काही वेळानंतर मात्र खून झाल्याचं उघड झालं.  मुकेश-जेनिफरच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्यात भांडण झालेल्या दिवशी घरातून मोठ्याने आवाज येत होता.

पण नंतर तो आवाज बंद झाला. त्यानंतर काही वेळाने मुकेश घराबाहेर गेला व जवळपास 20 मिनिटांनंतर परतला. थोड्या वेळ गेल्यानंतर तो मोठं पोतं घेऊन घराबाहेर निघाला व स्कूटीवर ते पोतं ठेवलं. परंतु घाईमध्ये पोतं खालून फाटलं व त्यातून जेनिफरचा एक हात बाहेर पडला.


Post a Comment

0 Comments