हरवलेले 20 मोबाईल पोलिसांनी नागरिकांना केले परत

 


शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक,पोलीस अंमलदार, आदेश चलवादी महिला पोलीस अंमलदार, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून, त्याबाबत तांत्रिक तपास करुन / त्याचा वारंवार पाठपुरावा करुन नागरीकांचे हरवलेले मोबाईल फोन हे गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले. हे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषांमध्ये संवाद साधुन हरवलेले एकुण 2.50 लाख रु किंमचीचे 20 मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.

हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करुन पुणे शहर पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे वेबसाईटला तसेच शासनाचे या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पुणे शहर पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.

ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड,सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, सहा. पो. निरी भोलेनाथ अहीवळे, पोलीस अंमलदार, अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, गणपत वाल कोळी आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, महिला पोलीस अंमलदार, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments