किरकोळ कारणावरून तिघांकडून तरुणावर वार

 


तायाप्पा मुसा जाधव (वय 19 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुरेश पवार (वय 28), रामा पवार (वय 26), शिवा पवार (वय 25) सर्व राहणार पिंपळे गुरव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नातेवाईकाला भेटण्यासाठी पिंपळे गुरव येथे गेले असता आरोपींनी तू ईथे काय करतोस म्हणून लाकडी दांडक्याने व कोयत्याने डोक्यात मारहाण करत जखमी केले. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास करत पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments