किरकोळ कारणावरून मारहाण करत लुटले संजय भीमराव डोंगरे (वय 43, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 12/जीजी 7171) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डोंगरे हे देहूफाटा आळंदी येथून त्यांच्या कारमधून प्रवास करत होते. त्यांनी कारचा हॉर्न वाजवला या कारणावरून आरोपीने डोंगरे यांना मारहाण केली. त्यांनतर डोंगरे यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी आरोपीने जबरदस्तीने चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments