तरुणाची हत्या करून मृतदेह घरात पुरला

 


उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाची  करुन आरोपीने 4 वर्षे मृतदेह आपल्या घरात पुरुन ठेवल्याची घटना घडली आहे.

बेपत्ता असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा सांगाडा गावातीलच एका खोलीत सापडला आहे. मन्सूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा गावातील ही घटना आहे. गब्रू असे मयत तरुणाचे नाव आहे.

गब्रू हा 25 नोव्हेंबर 2018 रोजी बेपत्ता झाला होता. याबाबत पोलिसात मिसिंगची तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर तरुणाचा बराच शोध घेऊनही तरुण सापडला नाही. गब्रू हा मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता

ज्या घरात मृतदेह सापडला आहे, त्या घराचा मालक सलमानने चार दिवसापूर्वी गब्रूचा काका सलीमला गब्रूची हत्या केल्याचे सांगितले. तसेच गब्रूचा मृतदेह घरातील एका खोलीत पुरल्याचेही सांगितले. हे ऐकून सलीमच्या पायाखालची जमीनच सरकली

यानंतर शनिवारी सलीमने गावातील काही लोकांना सोबत घेत सलमानच्या घरातील त्या खोलीत खोदकाम केले. खोदकाम केल्यानंतर खड्ड्यातून एक सांगाडा सापडला. यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत सांगाडा ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

Post a Comment

0 Comments